सव्वा लाखाच्या रेतीचा साठा जप्त; मलकापूर तहसीलदारांची कामगिरी
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाळूमाफियांचा अड्डा बनलेल्या काळेगाव (हरसोडा, ता. मलकापूर) शिवारातील विश्वगंगा नदीच्या पात्रात सव्वा लाख रुपयांची रेती अवैधरित्या साठवून ठेवण्यात आली होती. 50 ब्रास रेतीचा हा साठा तहसीलदार कु. स्वप्नाली डोईफोडे यांनी पथकासह छापा मारून काल जप्त केला.गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत तलाठी धीरज जाधव, तलाठी संतोष पारस्कर, कोतवाल नीलेश तायडे, …
Jun 13, 2021, 10:54 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाळूमाफियांचा अड्डा बनलेल्या काळेगाव (हरसोडा, ता. मलकापूर) शिवारातील विश्वगंगा नदीच्या पात्रात सव्वा लाख रुपयांची रेती अवैधरित्या साठवून ठेवण्यात आली होती. 50 ब्रास रेतीचा हा साठा तहसीलदार कु. स्वप्नाली डोईफोडे यांनी पथकासह छापा मारून काल जप्त केला.
गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत तलाठी धीरज जाधव, तलाठी संतोष पारस्कर, कोतवाल नीलेश तायडे, दिलीप तायडे आदींनी भाग घेतला. जप्त केलेला रेतीसाठा काळेगावचे पोलीस पाटील राजू पटेल यांच्या ताब्यात पंचनामा करून देण्यात आला आहे.