सलून, पार्लरला वगळा अन्यथा मासिक मानधन द्या! नाभिक महामंडळाची ‘ रोख’ठोक मागणी!!,थेट मुख्यमंत्र्यांना साकडे

संग्रामपूर (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 30 एप्रिलपर्यंत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सलून, पार्लर व्यावसायिकांना वगळा अन्यथा मासिक मानधन द्या, अशी रोखठोक मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने करून प्रशासकीय वर्तुळासह व्यवसाय वर्तुळात खळबळ उडवून दिली! संघटनेच्या संग्रामपूर शाखेने तहसीलदारांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी केली आहे. या निवेदनातून जिल्हाभरातील नाभिक समाज बांधवांच्या व्यथा आणि …
 

संग्रामपूर (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  30 एप्रिलपर्यंत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सलून, पार्लर व्यावसायिकांना वगळा अन्यथा मासिक मानधन द्या, अशी रोखठोक मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने  करून प्रशासकीय वर्तुळासह व्यवसाय वर्तुळात खळबळ उडवून दिली!

संघटनेच्या संग्रामपूर शाखेने तहसीलदारांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी केली आहे. या निवेदनातून जिल्हाभरातील नाभिक समाज बांधवांच्या व्यथा आणि समस्या मांडल्या आहेत. मागील वर्षी लावण्यात आलेल्या दीर्घ लॉकडाउनदरम्यान नाभिक बांधवांनी शासनाला सहकार्य केले. दीर्घकाळ व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी, समस्यांचा सामना केला, मात्र लॉक डाऊन उठविण्यात आल्यावर  शासनाने काहीच मदत केली नाही. यातून कसेबसे सावरत नाही तोच पुन्हा 5 ते 30 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन करून सलून, पार्लर बंद करून अडचणीत आणले आहे. यामुळे सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी अथवा मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी तालुकाध्यक्ष शिवकुमार भातखेडे, नीलेश आंबूस्कर, मोहन सोनोने, मधुकर अतकरे, गजानन सोनोने, श्याम उंबरकर, संजय माणेकर, गजानन सोनोने यांनी केली आहे.