संग्रामपूरच्‍या विकासासाठी नगरपंचायतीला ५० लाख निधी देणार -आमदार बाजोरिया

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील विकासकामे करण्यासाठी संग्रामपूर नगर पंचायतीने कृती आराखडा तयार करून निधी मागणीचा प्रस्ताव त्वरित सादर केल्यास नगर पंचायत प्रशासनाला ५० लाख रुपयांचा विकास निधी देणार असल्याचे आश्वासन आमदार गोपीकिसन बाजोरीया यांनी दिले. आमदार बाजोरिया यांनी नगर पंचायतला भेट देऊन प्रशासकीय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असलेल्या बाजोरीया यांचा …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील विकासकामे करण्यासाठी संग्रामपूर नगर पंचायतीने कृती आराखडा तयार करून निधी मागणीचा प्रस्ताव त्वरित सादर केल्यास नगर पंचायत प्रशासनाला ५० लाख रुपयांचा विकास निधी देणार असल्याचे आश्वासन आमदार गोपीकिसन बाजोरीया यांनी दिले. आमदार बाजोरिया यांनी नगर पंचायतला भेट देऊन प्रशासकीय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असलेल्‍या बाजोरीया यांचा सत्कार गटनेते आनंद राजनकर यांच्यासह नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मुख्यधिकारी रेखा वाणी, माजी नगरसेवक रामेश्वर गावंडे, उपाध्यक्ष सै. आसिफ सै. खलिल, पंकज तायडे, सुनिस पा. राजनकर, संतोष म्हसाळ, शरद कोल्हे, श्री. गोरे, कर्मचारी नाना मानकर, विठ्ठल वानखडे आदी उपस्‍थित होते.