संग्रामपूर ः आरोग्याची काळजी घेत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरे करा; उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांचे आवाहन

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्याची काळजी घेत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी केले. पातुर्डा पोलीस चौकीत गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. कोळी बोलत होते. पातुर्डा गाव संत, महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेले असल्याने सर्व जाती, धर्माचे नागरिक गुण्या …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्‍या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्याची काळजी घेत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी केले.

पातुर्डा पोलीस चौकीत गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्‍यावेळी श्री. कोळी बोलत होते. पातुर्डा गाव संत, महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेले असल्याने सर्व जाती, धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात. सण-उत्सव साजरे करतात. ही कौतुकास्पद ओळख कायम ठेवण्याचे आवाहनही केले. प्रास्ताविक मनोहर बोराखडे यांनी केले. श्री. कोळी व ठाणेदार उलेमाले यांचा पातुर्डा ग्रामस्थांतर्फे शाल- श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी सन उत्सव शासनाच्या नियमानुसार गणेत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांनी काळजी घेत कायदा सुव्यवस्था बाधीत राखण्याचे आवाहन केले. यावेळी मनोहर बोराखडे, लोकेश राठी, शेख सुलतान, मीर कुर्बान अली, माजी सैनिक साहेबराव वानखडे, शेषराव वानखडे, तंटामुक्त अध्यक्ष देविदास इंगळे, अविनाश धर्माळ, रामेश्वर भड, अनंता सातव, अमित भोंगळ, अविनाश बोपले, युवराज वानखडे, ईरफानोद्दीन काझी, पप्पू पठाण, विलास मानकर, बीट जमादार किशोर तिवारी, पोलीस कर्मचारी संदीप सोनोने, नीलेश नळेकर, राणा ओईम्बे, पोलीस पाटील प्रशांत चोपडे, गणेश सुरडकार, प्रशांत खंडेराव, गणेश फाडके यांच्‍यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्‍थित होते.