श्रीकांत देवराव धांडे यांची इस्‍त्रोत निवड; खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील जमादार वडिलांचा विश्वास ठरवला सार्थ!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल देवराव धांडे यांचे सुपूत्र श्रीकांत देवराव धांडे यांची इस्त्रो (Mech) पॅनल नंबर ४९ मध्ये निवड झाली. केवळ धांडे कुटुंबासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद ठरली आहे. याबद्दल स्वतः खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नाईकनवरे, सहायक …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्‍स्‍टेबल देवराव धांडे यांचे सुपूत्र श्रीकांत देवराव धांडे यांची इस्‍त्रो (Mech) पॅनल नंबर ४९ मध्ये निवड झाली. केवळ धांडे कुटुंबासाठीच नव्‍हे तर जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्‍पद ठरली आहे. याबद्दल स्वतः खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नाईकनवरे, सहायक पोलीस निरिक्षक श्री. गोंदके, पोलीस उपनिरिक्षक श्री. धोत्रे, श्री. राठोड व देवराव धांडे यांनी श्रीकांत यांचे अभिनंदन केले.