शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता हरसोडा (ता. मलकापूर) येथे घडली. हरसोडा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी साडेचारच्या सुमारास शौचाला गेला होती. त्यावेळी गावातीलच सारंगधर प्रभाकर कहाते (२२) याने तिचा हात धरून त्याच्या घरात नेले. तोंड …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता हरसोडा (ता. मलकापूर) येथे घडली.

हरसोडा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी साडेचारच्‍या सुमारास शौचाला गेला होती. त्यावेळी गावातीलच सारंगधर प्रभाकर कहाते (२२) याने तिचा हात धरून त्याच्या घरात नेले. तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केला. तिने आरडाओरड केल्याने काही लोकांनी दरवाजा वाजवला. त्यामुळे तो दुसऱ्या दरवाजाने पळून गेला. घटनेनंतर पीडितेच्‍यावडिलांनी एमआयडीसी मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सारंगधरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काल, १७ ऑक्टोबर रोजी पहाटे आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.