शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; शेगाव तालुक्यातील घटना

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, ८ ऑक्टोबरला सकाळी पावणेबाराच्या सुमारास माटरगाव शिवरातील डोलारखेड फाट्याजवळ घडली. सोपान महादेव सपकाळ (४२, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी ते रोहित्राजवळ गेले. शॉक …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, ८ ऑक्टोबरला सकाळी पावणेबाराच्या सुमारास माटरगाव शिवरातील डोलारखेड फाट्याजवळ घडली.

सोपान महादेव सपकाळ (४२, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी ते रोहित्राजवळ गेले. शॉक लागून ते जागीच कोसळले. डोलारखेड येथील राजेंद्र देठे यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी ही माहिती मृतकाच्या नातेवाइकांना दिली. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.