शेगावमध्ये नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा पुतळा जाळला; “प्रहार’चे आंदोलन
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी चौकाचौकात वाहने लावून मूर्ती स्वीकारल्या. नंतर पाण्याच्या टाक्यांत विसर्जन करवले. मात्र या टाक्या घाण होत्या. त्यात गणरायाचे विसर्जन केल्याने प्रहार संघटना संतापली असून, यामुळे मूर्तीची विटंबना झाल्याचे म्हणत आज, २० सप्टेंबरला गांधी चौकात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचा पुतळा जाळण्यात आला. प्रशासनाच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनकर्त्यांविरुद्ध कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्याने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनात नीलेश घोंगे, राजू मसने, सागर घुले, निखिल काठोळे, नितीन टवरे, विकी सारवान, कुशल सारवान, अजय बोरसे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.