शेगाव बाजार समितीत नवीन मूग खरेदीस प्रारंभ; ६९०१ रुपये प्रतिक्विंटल दर!
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज, १७ ऑगस्टपासून नवीन मूग खरेदीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी नीलेश राठी यांच्या ओममधुशंकर ट्रेडिंग कंपनीत ६९०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. यावेळी सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, सभापती श्रीधररराव उन्हाळे यांच्या हस्ते मूग घेऊन आलेले शेतकरी वासुदेव उन्हाळे (रा. जवळा) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रीधर …
Aug 17, 2021, 17:40 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज, १७ ऑगस्टपासून नवीन मूग खरेदीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी नीलेश राठी यांच्या ओममधुशंकर ट्रेडिंग कंपनीत ६९०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
यावेळी सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, सभापती श्रीधररराव उन्हाळे यांच्या हस्ते मूग घेऊन आलेले शेतकरी वासुदेव उन्हाळे (रा. जवळा) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रीधर पाटील, गिरिश भुतडा, श्याम राठी, दीपक अग्रवाल, मनोज खंडेलवाल, मनीष अग्रवाल, नारायण शर्मा, गोविंद शेगोकार, राजेश चव्हाण, प्रमोद पाटील, सुनील कलोरे, घनश्याम खंडेलवाल, विनोद पुंडकर, उमेश कुलकर्णी, नितीन तायडे, भगवान घाटे, प्रशांत घोडेराव, दीपक कडाळे आदींची उपस्थिती होती.