शेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी पहुरकार, उपसभापतीपदी भिवटे बिनविरोध!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सहकार पॅनलचे शेषराव पहुरकार आणि उपसभापतीपदी पुंडलिक भिवटे यांची आज, २२ सप्टेंबरला बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदुरा सहकारी संस्था निबंधक अविनाश सांगळे तर सहाय्यक म्हणून बाजार समिती सचिव विलास पुंडकर यांनी काम पाहिले. श्रीधरराव उन्हाळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सभापतीपद …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सहकार पॅनलचे शेषराव पहुरकार आणि उपसभापतीपदी पुंडलिक भिवटे यांची आज, २२ सप्‍टेंबरला बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदुरा सहकारी संस्था निबंधक अविनाश सांगळे तर सहाय्यक म्हणून बाजार समिती सचिव विलास पुंडकर यांनी काम पाहिले. श्रीधरराव उन्हाळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सभापतीपद तर उपसभापती सुनील वानखडे अपात्र ठरल्याने त्यांचे उपसभापतीपद रिक्त झाले होते. यावेळी बाजार समितीचे ज्‍येष्ठ संचालक तथा सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक श्रीधरराव उन्हाळे, संचालक श्रीधर पांडुरंग पाटील, नीलेश राठी, सुरेश पाटील कराळे, रामरतन पुंडकर, संचालिका श्रीमती पंचफुलाबाई जवंजाळ, संचालक सौ. नंदाबाई रमेश पाटील- उमाळे आदींची उपस्थिती होती. सभेनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

व्यापारी असोसिएशनतर्फे संजयसेठ टीबडेवाल यांनीही सत्कार केला. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील उमाळे, किसनराव घाटे, बाळू उन्हाळे, मनसे तालुकाध्यक्ष रवींद्र उन्हाळे, मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष अविनाश बाठे, खरेदी विक्री संघाचे संचालक एकनाथ पाटील, अनिल शेजोळे, रमेश पाटील शेजोळे, बाजार समितीचे लेखापाल विनोद पुंडकर, निरीक्षक अनंत शेगोकार, कॅशिअर सौ. सुनीता गावंडे, कर्मचारी नागोराव डाबेराव, उमेश कुळकर्णी, नितीन तायडे आदींची उपस्थिती होती.