शेगाव नगर परिषदेने स्वागत कमानीला दिले निष्ठावंत वारकर्याचे नाव!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर परिषदेतर्फे प्रभाग 8 मधील वै. पुरुषोत्तम हरी गणेश पाटीलनगर येथील प्रवेशद्वार कमानीला निष्ठावंत वारकरी वै. पुरुषोत्तम हरी गणेश पाटील यांचे देण्यात आलेले नाव सार्थ ठरल्याचे मत हा.भ.प. तुकाराम महाराज ईलोरा यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.
नगर परिषद प्रशासनातर्फे स्वागत कमान उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवारी (दि.3) घेण्यात आला. उद्घाटक म्हणून ह.भ.प. श्री तुकाराम महाराज ईलोरा होते. मुख्य अतिथी म्हणून सौ. अपर्णाताई कुटे होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई बूच होत्या. विशेष उपस्थितांमध्ये ज्ञानेश्वरदादा पुरुषोत्तम पाटील (अध्यक्ष माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स), न.प. उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई कलोरे, न.प. गटनेते शरदचंद्र अग्रवाल, नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, दिनेश शिंदे, सौ. अल्काताई खानजोडे, न. प. बांधकाम सभापती सौ. रत्नमाला ठवे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. वै. पुरुषोत्तम हरी गणेश पाटील शिक्षण संस्थेच्यावतीने श्री ज्ञानेश्वरदादा पाटील, विठ्ठलदादा पाटील, श्रीधरदादा पाटील, कु. रेणुका ज्ञा. पाटील, कु. अंबिका ज्ञा. पाटील, कु. देविका ज्ञा. पाटील, कु. पालक विश्वेश्वर पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील, शिवाजीराव बुरुंगले, नगरसेवक पांडुरंग बुच, गजानन जवंजाळ, सुनील शेगोकार, दीपक ढमाळ, के. टी. चव्हाण, रवींद्र रायने, अॅड. शैलेष पाटोकर, शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्याधर उन्हाळे, सचिव विलास पुंडकर, प्रदीप अवचार, अरुण पोहरे, दत्ताभाऊ भोंडेकर दीपक सलामपुरीया, दिलीप पाटकर, कैलास देशमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संदीप कराळे यांनी केले.