विटांनी भरलेला टेम्पो उलटला; ५ जण गंभीर जखमी; नांदुरा तालुक्यातील घटना

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विटांनी भरलेला टेम्पो उलटून पाच मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना मोताळा – नांदुरा रोडवरील निंबोळा देवीजवळ आज, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली. दाताळा (ता. मोताळा) येथील कापडे वीट उत्पादक येथून विटा घेऊन टेम्पो जळगाव जामोदला जात होता. निंबोळा देवी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो …
 

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विटांनी भरलेला टेम्पो उलटून पाच मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना मोताळा – नांदुरा रोडवरील निंबोळा देवीजवळ आज, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्‍या सुमारास घडली.

दाताळा (ता. मोताळा) येथील कापडे वीट उत्पादक येथून विटा घेऊन टेम्पो जळगाव जामोदला जात होता. निंबोळा देवी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला. यात राजू तेजराव पुरवे (२५), धनराज जयसिंग ब्राह्मणे (३२), शेख अजहर शेख इसाक पटेल (२२), उमेश जगदेव भोलवनकर (२५), विलास कचरू कळमकर (३५, सर्व रा. बोराखेडी, ता. मोताळा) गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वडनेर भोलजी चौकीचे पोलीस कर्मचारी विक्रम राजपूत, अमोल खोंदिल यांच्‍यासह ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकार, श्रीकृष्ण नालट, कृष्णा वसोकार, १०८ रुग्णवाहिकेसह चालक किशोर क्षीरसागर घटनास्थळी धावले. जखमींना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.