वाण धरणाचे चार दरवाजे उघडले!; नदीला मोठा पूर

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वारी हनुमान (ता. संग्रामपूर) येथील वाण धरण ओव्हर फुल्ल झाले असून, काल, १४ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास धरणाचे सहापैकी चार दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वाण नदीला मोठा पूर आला. प्रतिसेकंद ८५.११ घनमीटर पाण्याचा विसर्ग धरणातून सध्या सुरू आहे. धरण सध्या ९४ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणात …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वारी हनुमान (ता. संग्रामपूर) येथील वाण धरण ओव्‍हर फुल्ल झाले असून, काल, १४ सप्‍टेंबरला रात्री साडेआठच्‍या सुमारास धरणाचे सहापैकी चार दरवाजे उघडण्यात आले. त्‍यामुळे वाण नदीला मोठा पूर आला.

प्रतिसेकंद ८५.११ घनमीटर पाण्याचा विसर्ग धरणातून सध्या सुरू आहे. धरण सध्या ९४ टक्‍के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणात पाण्याचा ओघ कायम आहे. त्‍यामुळे चार दरवाजे २५ सें.मी. उघडण्यात आले आहेत. पाण्याचा ओघ वाढल्यास सहाही दरवाजे उघडावे लागणार आहेत. येत्‍या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा वर्तविण्यात आल्याने वाण नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.