वडशिंगी शाळेला आयएसओ मानांकन!; जळगाव जामोद तालुक्यातील पहिलीच शाळा

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडशिंगी (ता. जळगाव जामोद) येथील जिल्हा परिषद केेंद्रीय प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. संबंधित अधिकारी पी. एन. पाटील यांनी भेट देऊन शाळेची मानांकनासाठी पाहणी करून त्याच दिवशी नोंदणी केली होती. आज, 24 जानेवारीला शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. तालुक्यात आयएसओ मानांकन मिळविणारी ही …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडशिंगी (ता. जळगाव जामोद) येथील जिल्हा परिषद केेंद्रीय प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. संबंधित अधिकारी पी. एन. पाटील यांनी भेट देऊन शाळेची मानांकनासाठी पाहणी करून त्याच दिवशी नोंदणी केली होती. आज, 24 जानेवारीला शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. तालुक्यात आयएसओ मानांकन मिळविणारी ही पहिली शाळा ठरली आहे.