वडगाव गडच्या सरपंचपदी सौ. उर्मिला रमेश ताकोते
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडगाव गड (ता. जळगाव जामोद) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला रमेश ताकोते यांची निवड झाली आहे. त्यांना 13 पैकी 9 मते मिळाली. वडगाव गड ग्रामपंचायतीची निवडणूक आज, 3 मार्चला पार पडली. महाविकास आघाडीचे पॅनलचे 9 सदस्य या गावात निवडून आले आहेत. दादाराव ताकोते पाटील हे पॅनलप्रमुख आहेत. …
Mar 3, 2021, 22:58 IST
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडगाव गड (ता. जळगाव जामोद) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला रमेश ताकोते यांची निवड झाली आहे. त्यांना 13 पैकी 9 मते मिळाली.
वडगाव गड ग्रामपंचायतीची निवडणूक आज, 3 मार्चला पार पडली. महाविकास आघाडीचे पॅनलचे 9 सदस्य या गावात निवडून आले आहेत. दादाराव ताकोते पाटील हे पॅनलप्रमुख आहेत. सौ. ताकोते या उच्च शिक्षित महिला असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक सौ. गोकुळा महादेव ताकोते यांच्या सूनबाई आहेत. जागा ओबीसी महिलांसाठी राखीव होती. पॅनलचे सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.