रेल्वेखाली येऊन ३० वर्षीय महिलेचा मृत्‍यू! शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली येऊन ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कवटी फुटलेल्या अवस्थेत रूळाच्या बाजूला मिळून आला. ही घटना आज, १२ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास नागझरी (ता. शेगाव) शिवारात समोर आली. रेल्वे ट्रॅक मेंटेनन्सचे काम करणाऱ्या नंदन मधुकर शेगोकार (रा. नागझरी रोड तीन पुतळे परिसर शेगाव) यांनी शेगाव शहर पोलिसांना कळवले. …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली येऊन ३० वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला. तिचा मृतदेह कवटी फुटलेल्या अवस्‍थेत रूळाच्‍या बाजूला मिळून आला. ही घटना आज, १२ ऑक्‍टोबरला दुपारी तीनच्‍या सुमारास नागझरी (ता. शेगाव) शिवारात समोर आली. रेल्‍वे ट्रॅक मेंटेनन्सचे काम करणाऱ्या नंदन मधुकर शेगोकार (रा. नागझरी रोड तीन पुतळे परिसर शेगाव) यांनी शेगाव शहर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. तपास नापोकाँ ज्ञानदेव डाबेराव करत आहेत.