राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शेगावमध्ये संविधान सरनामा रॅली उत्साहात

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्यार्थ्यांत सरनामामधील मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेगाव येथे आज, 23 जानेवारीला संविधान सरनामा रॅली काढण्यात आली.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण दाभाडे यांच्या नेतृत्वात ही रॅली निघाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्यार्थ्यांत सरनामामधील मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेगाव येथे आज, 23 जानेवारीला संविधान सरनामा रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण दाभाडे यांच्या नेतृत्वात ही रॅली निघाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. रॅलीत युवा नेते सचिन शेगोकार, विद्यार्थी शहराध्यक्ष वैभव पवार, शुद्धोधन शेगोकार, राजू ठाकूर, गजाननराव गारमोडे, शीघ्रकवी शेगोकार, सिद्धांत शेगोकार, शेख शाकीर, ऋषी पाटील, शैलेश देशमुख समर्थ पोहरे, विवेक गाडेकर, आकाश निकम, सौरभ डोंगरे, सुमेध सिरसाट, धम्मपाल सिरसाट, संघपाल इंगळे, अमरदीप सुरवाडे, सत्यशील वानखडे, रोशन शेगोकार, धीरज शेगोकार, शुभम फुलकर उपस्थित होते.