यादव बेकरी प्रायोजित शेगाव प्रीमियम लीग सामने 21 जानेवारीपासून
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील यादव बेकरीद्वारा प्रायोजित व छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट सामने 21 जानेवारीपासून श्री यादव बेकरीच्या मागे शिवाजीनगर शेगाव, वरवट संग्रामपूर रोड येथे होणार आहेत. शेगाव प्रीमियम लीग असे या स्पर्धेला नाव देण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी श्री यादव बेकरी यांच्याकडून आकर्षक चार बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आली आहेत. पहिले बक्षीस 11 हजार 111 आहे. खेळण्यासाठी इच्छुक असलेल्या क्रिकेट क्लबनी आकाश जाधव (मो. 7666770466), यश शिनगारे (मो. 8830981924), अभय देवकते (मो. 7499226917), सुमित डांंबे (मो. 9021395691), करण डांबे (मो. 7020560436) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.