मुलाकडून शौचालयाची सफाई करून घेतली…. ग्रामसेवक निलंबित, गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; संग्रामपूर तालुक्‍यातील प्रकार

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मारोड (ता. संग्रामपूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कोरोना रुग्णांसाठी घाईघाईत विलगीकरण कक्ष तयार करताना एका शाळकरी मुलाकडून शौचालयाची साफसफाई करून घेण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी ग्रामसेवक विकास मुकिंदा शिवदे याला निलंबित करण्यात आले आहे, गट शिक्षणाअधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.तहसीलदार …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मारोड (ता. संग्रामपूर) येथील जिल्हा परिषदेच्‍या प्राथमिक शाळेत कोरोना रुग्‍णांसाठी घाईघाईत विलगीकरण कक्ष तयार करताना एका शाळकरी मुलाकडून शौचालयाची साफसफाई करून घेण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्‍यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी ग्रामसेवक विकास मुकिंदा शिवदे याला निलंबित करण्यात आले आहे, गट शिक्षणाअधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तहसीलदार तेजश्री कोरे यांनी या प्रकरणात बीडीओ संजय पाटील यांच्‍याकडून खुलासा मागवला होता. त्‍यात प्रथम दर्शनी ग्रामसेवकाला जबाबदार धरण्यात आले. या प्रकरणी भाऊ भोजने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. या प्रकरणी आणखी काही कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते आणि कारवाईची शक्‍यता नाकारता येत नाही.