माहेरावरून ५० हजार आणण्यासाठी छळ, घराबाहेर हाकलले!; खामगावमध्ये विवाहितेची पोलिसांत धाव!!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरावरून ५० हजार रुपये आण असे म्हणून विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध खामगावच्या शिवाजीनगर पोलिसांनी आज, २७ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुना फैल भागातील २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली. अब्दुल रईस अब्दुल नबी, अब्दुल नबी गुलाम हुसेन, मेहराजबी अब्दुल नबी, अब्दुल रशिद …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरावरून ५० हजार रुपये आण असे म्‍हणून विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध खामगावच्‍या शिवाजीनगर पोलिसांनी आज, २७ सप्‍टेंबरला गुन्‍हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुना फैल भागातील २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली.

अब्दुल रईस अब्दुल नबी, अब्दुल नबी गुलाम हुसेन, मेहराजबी अब्दुल नबी, अब्दुल रशिद अब्दुल नबी, परविनबी अब्दुल रशिद, अब्दुल आजीम अब्दुल नबी, अब्दुल शाहरूख अब्दुल नबी, शबाना परवीन अब्दुल मुन्ना (सर्व रा. चाचा फकीरचंद चांदवाडा, राजघाट नाला, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. नाजेमा परविन ज. अब्दुल रईस हिने दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की तू माहेरावरून कमी हुंडा आणला. आता ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्‍हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. शिविगाळ करून मारहाण केली. लहान मुलांसह घराबाहेर हाकलून दिले. तपास पोहेकाँ गोविंद चव्हाण करत आहेत.