माटरगाव ते खामगाव रोड रखडल्याने वाढले अपघात

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माटरगाव ते खामगाव रोडचे काम दिवाळीपासून बंद आहे. या रस्त्यावर वाहने चालवणेही कठीण होत आहे. डोळ्यांत धूळ जात असल्याने मोटरसायकलच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कामाला विलंब होत असला तरी या रोडवर रोज पाणी मारावे व रोडचे काम लवकरात लवकर चालू करून पूर्ण करावे, अशी मागणी सत्याग्रह …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माटरगाव ते खामगाव रोडचे काम दिवाळीपासून बंद आहे. या रस्त्यावर वाहने चालवणेही कठीण होत आहे. डोळ्यांत धूळ जात असल्याने मोटरसायकलच्‍या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कामाला विलंब होत असला तरी या रोडवर रोज पाणी मारावे व रोडचे काम लवकरात लवकर चालू करून पूर्ण करावे, अशी मागणी सत्याग्रह शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अयाज शेख अमीर, गणेश सडतकार, मोहन कवरे, मनीष खवले यांनी केली आहे. काम चालू नाही झाले तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.  मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.