मनसगाव येथे कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मनसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज, 20 एप्रिलला ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आरोग्य विभागातर्फे कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. गावातील जवळपास सर्वच लाभार्थ्यांनी (45 वर्षांच्या वय वयाच्या व्यक्ती) लसीकरण करून घेतले. आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सकाळीच लसीकरणाला सुरुवात केली. ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कराळे व उपसरपंच सय्यद साजीद यांनी अथक परिश्रम …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मनसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज, 20 एप्रिलला ग्रामपंचायतीच्‍या सहकार्याने आरोग्य विभागातर्फे कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. गावातील जवळपास सर्वच लाभार्थ्यांनी (45 वर्षांच्‍या वय वयाच्‍या व्‍यक्‍ती) लसीकरण करून घेतले.

आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सकाळीच लसीकरणाला सुरुवात केली. ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कराळे व उपसरपंच सय्यद साजीद यांनी अथक परिश्रम घेतले. तलाठी पी. डब्ल्यू. मालोक, ग्रामसेवक श्री. वैराळ, कोतवाल अनंता भटकर, आरोग्य सेवक विजय हिंगणे, डॉ. चिंचोळकर, आरोग्य सेविका पोटदुखे ताई, वर्षाताई धुळे, दिलीप सोनोने, अरुण सोनवणे, श्री. महाले, श्री. तायडे, ऑपरेटर सय्यद इक्रार, दादाराव कराळे, अर्चना रोहणकर, निंबाळकर ताई,  विनोद कंकाळ पोलीस पाटील मनसगाव आदींची उपस्थिती होती.