ब्रिटिशकालीन पूल कोसळला!; जिल्ह्याच्‍या सीमेवरील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याने रस्त्याने कोंबड्या घेऊन जाणारे बोलेरो वाहन पुलावर अडकले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. आज, 11 जूनच्या सकाळी जिल्ह्याच्या सीमेवरील लोहारागावाजवळ (ता. बाळापूर) येथे ही घटना घडली. शेगाव-अकोट राज्य मार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर ब्रिटिशकालीन पूल आहे. जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याने रस्त्याने कोंबड्या घेऊन जाणारे बोलेरो वाहन पुलावर अडकले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. आज, 11 जूनच्या सकाळी जिल्ह्याच्‍या सीमेवरील लोहारागावाजवळ (ता. बाळापूर) येथे ही घटना घडली.

शेगाव-अकोट राज्य मार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर ब्रिटिशकालीन पूल आहे. जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. मात्र, नवीन पूल तयार करत असताना कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केले. यामुळे सकाळी या पुलावरून बोलेरो वाहन कोंबड्या घेऊन जात असताना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. यामुळे बोलेरो नदीत अडकली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पूल खचल्याने या राज्यमार्गावरील वाहतूक अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.