बाबोऽऽ लाडनापूर शिवारात वाघ!; बैलाची शिकार केली, वनविभागाकडून शोध सुरू!!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर रामभाऊ बोदडे यांच्या शेतात बैल जोडी बांधलेली असताना वाघाने हल्ला केल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. ही घटना शेतकरी शेतात आल्यानंतर काल, १९ ऑक्टोबरला सकाळी समोर आली. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू पथकासह घटनास्थळ गाठले. मात्र शोध घेऊनही वाघाला …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातपुड्याच्‍या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात १८ ऑक्‍टोबरच्‍या मध्यरात्रीनंतर रामभाऊ बोदडे यांच्या शेतात बैल जोडी बांधलेली असताना वाघाने हल्ला केल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. ही घटना शेतकरी शेतात आल्यानंतर काल, १९ ऑक्‍टोबरला सकाळी समोर आली.

वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्‍यानंतर वनविभागाने रेस्‍क्‍यू पथकासह घटनास्थळ गाठले. मात्र शोध घेऊनही वाघाला जेरबंद करण्यात पथकाला यश आले नाही. वाघाच्या ठशांवरून लाडनापूर शेतशिवारात शोध कार्य राबविण्यात आले. मात्र पिकांच्‍या झालेल्या वाढीमुळे वाघाला गायब होण्यास मदत झाली. बोदडे यांच्या शेतातील बांधलेल्या गोठ्यातील बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले व घटनास्थळापासून १०० फुटांपर्यंत बैलाला फरपटत नेऊन बैलाला फाडून टाकले. दोन दिवसांत हल्ल्याची दुसरी घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतावजा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.