पोलीस पाटलांनी केला हिवरखेडच्‍या नव्या ठाणेदारांचा सत्‍कार!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची २८ ऑगस्टला सकाळी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार गजानन वाघ यांचा पोलीस पाटील संघटनेतर्फे जिल्हा सचिव राजाभाऊ लोखंडकार, सुरेश भिसे, सुरेंद्र इंगळे, संतोष मोरे यांनी सत्कार केला. दुय्यम ठाणेदार हरिविजय बाबडे यांचासुद्धा महादेव पाटील, राजेंद्र पांढरे, …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरखेड पोलीस ठाण्याच्‍या हद्दीतील पोलीस पाटलांची २८ ऑगस्‍टला सकाळी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार गजानन वाघ यांचा पोलीस पाटील संघटनेतर्फे जिल्हा सचिव राजाभाऊ लोखंडकार, सुरेश भिसे, सुरेंद्र इंगळे, संतोष मोरे यांनी सत्कार केला. दुय्यम ठाणेदार हरिविजय बाबडे यांचासुद्धा महादेव पाटील, राजेंद्र पांढरे, विशाल हेलोडे, जगन्नाथ टीकार यांनी सत्कार केला. यावेळी महिला पोलीस पाटील स्वाती खंडारे, शर्मिला कोळपे, भगवान नेमाने, सुरेश भिसे, सुरेंद्र इंगळे यांच्‍यासह बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस पाटील संतोष मोरे यांनी केले.