पोलीस अधीक्षकांचे आवाहन… उत्‍साहासोबत आरोग्‍यही महत्त्वाचे!; कोरोनाविषयक नियमांचे पालन करा!!

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गणेशोत्सवासह आगामी प्रत्येक सण, उत्सव उत्साहाने साजरे करा. मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालनही करा. उत्साहासोबत आरोग्यही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले.नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात ३ सप्टेंबरला शांतता समितीची बैठक पार पडली. त्यावेळी श्री. चावरिया बोलत होते. आमदार राजेश …
 

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गणेशोत्‍सवासह आगामी प्रत्‍येक सण, उत्‍सव उत्‍साहाने साजरे करा. मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालनही करा. उत्‍साहासोबत आरोग्‍यही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले.
नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात ३ सप्टेंबरला शांतता समितीची बैठक पार पडली. त्‍यावेळी श्री. चावरिया बोलत होते. आमदार राजेश एकडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. व्‍यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, उपविभागीय अधिकारी श्री. देशमुख, तहसीलदार राहुल तायडे, नगराध्यक्षा रजनी जवरे, ठाणेदार भूषण गावंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश पांडे यांनी केले. आभार एपीआय श्री. गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नांदुरा पोलीस ठाण्याचे दिलीपसिंह राजपूत, अरुण खुंटाफळे, रवी राठोड, शिवाजीराव अरबट, श्री. बहादूरकर, श्री. ससाणे आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.