पोलिसांच्‍या वाहनाला मोटारसायकल धडकली; तिघे जखमी, संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार जण मोटारसायकलवर बसून सुसाट जात असताना त्यांनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यात तिघे जखमी झाले. शिवाय पोलीस वाहनाचेही नुकसान केले. तामगाव पोलिसांनी मोटारसायकल चालविणाऱ्या २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जस्तगाव- वरवट बकाल रस्त्यावरील मनार्डी फाट्याजवळ काल, ६ सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार जण मोटारसायकलवर बसून सुसाट जात असताना त्‍यांनी पोलिसांच्‍या वाहनाला धडक दिली. यात तिघे जखमी झाले. शिवाय पोलीस वाहनाचेही नुकसान केले. तामगाव पोलिसांनी मोटारसायकल चालविणाऱ्या २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. जस्तगाव- वरवट बकाल रस्‍त्‍यावरील मनार्डी फाट्याजवळ काल, ६ सप्‍टेंबरला सायंकाळी सातच्‍या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलीस चालक पोहेकाँ संतोष तुळशीराम अखरे (४७) यांनी तक्रार दिली. शाहरुख सय्यद अकबर (२८, रा. सजनपुरी, खामगाव) असे गुन्‍हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पेट्रोलिंग करणारे पोलिसांचे वाहन (टाटा सुमो क्र. MH 28 C 6507) जस्तगावकडून मनार्डी फाट्याकडे येत होते. त्‍याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या होंडा शाइन मोटारसायकलने (क्र. एमएच २८ एएम ८७३२) पोलीस वाहनाला धडक दिली. मोटारसायकलवर चौघे जण होते. शाहरुख सय्यद हा भरधाव व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवत होता. या अपघातात ते तिघे जखमी झाले व सरकारी वाहनाचे व मोटारसायकलीचेही मोठे नुकसान झाले. जखमींना ॲम्बुलन्समध्ये टाकून शेगाव येथे सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता पाठविण्यात आले.