पूर पाहण्यासाठी गेला, पाय घसरून युवक नळगंगा नदीत गेला वाहून…; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नळगंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आलेला युवक पाय घसरून नळगंगा नदीत पडला अन् वाहून गेला. ही दुर्दैवी घटना काल, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास मलकापूर शहरातील सालीपुरा पुलाजवळ घडली. नटवरसिंग झामसिंग राजपूत (३५, रा. मलकापूर) असे नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. नळगंगा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने मलकापूर शहराला …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नळगंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आलेला युवक पाय घसरून नळगंगा नदीत पडला अन्‌ वाहून गेला. ही दुर्दैवी घटना काल, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्‍या सुमारास मलकापूर शहरातील सालीपुरा पुलाजवळ घडली.

नटवरसिंग झामसिंग राजपूत (३५, रा. मलकापूर) असे नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. नळगंगा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने मलकापूर शहराला लागून असलेली नदी दुथडी भरून वाहत होती. पूर पाहण्यासाठी सालीपुरा पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. नटवरसिंगही आला होता. पाय घसरल्याने तो नदीपात्रात नडला व वाहून जाऊ लागला. नागरिकांनी आरडाओरड केल्याने काही तरुणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रयत्न असफल ठरले. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष हरीश रावळ, मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काल रात्री उशिरापर्यंत त्‍याचा शोध सुरू होता.