पुन्‍हा विकासाला ब्रेक; पातोंडा पेडकात सत्ताधाऱ्यांची मनमानी!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता व त्या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी म्हणून गावकऱ्यांच्या आग्रहामुळे ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर लगर व गजानन तायडे यांनी प्रस्ताव सत्ताधाऱ्यांपुढे ठेवला. मात्र विकासाला ब्रेक देण्याची परंपरा सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवल्याचा प्रकार पातोंडा पेडका (ता. खामगाव) गट ग्रामपंचायतीत समोर आला आहे. या आधी सुद्धा जे लोक वेळेवर पाणीपट्टी भरत होते, …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता व त्या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी म्‍हणून गावकऱ्यांच्‍या आग्रहामुळे ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर लगर व गजानन तायडे यांनी प्रस्‍ताव सत्ताधाऱ्यांपुढे ठेवला. मात्र विकासाला ब्रेक देण्याची परंपरा सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवल्याचा प्रकार पातोंडा पेडका (ता. खामगाव) गट ग्रामपंचायतीत समोर आला आहे.

या आधी सुद्धा जे लोक वेळेवर पाणीपट्टी भरत होते, त्यांचे नळकनेक्शन ग्रामपंचायतीने कापले होते. ग्रामस्‍थांनी संताप केल्यावर दोन दिवसांत पुन्हा नळ कनेक्शन जोडण्यात आले होते. २६ जुलैच्या ग्रामसभेत सदस्य लगर व तायडे यांनी स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता व त्या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी, असा ठराव मांडला. मात्र हा ठराव मान्य न करता पुन्हा एकदा गावाच्या विकासाला ब्रेक देण्याचा प्रयत्न झाला. यामुळे ग्रामस्‍थांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार न करता गावाच्या हिताची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.