पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्‍या वाढदिवसानिमित्त शेगाव, नांदुऱ्यात लोकहिताचे कार्यक्रम, नेत्रदानाचा संकल्‍प

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण दाभाडे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रा. अनुजाताई सावळे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नेत्रदानाचा संकल्प कार्यक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे मोठे कार्यक्रम न घेण्याच आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले होते. त्यामुळे मोजक्या …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्‍या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण दाभाडे आणि महिला आघाडीच्‍या जिल्हाध्यक्षा प्रा. अनुजाताई सावळे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नेत्रदानाचा संकल्प कार्यक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे मोठे कार्यक्रम न घेण्याच आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले होते. त्‍यामुळे मोजक्या पदाधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत शेगावमध्ये केक कापण्यात आला. यावेळी बुलडाणा लाइव्‍हने डॉ. शिंगणे यांच्‍या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध केलेल्या साहेब या विशेष पुरवणीचे प्रकाशनही करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल येथे हा कार्यक्रम महिला आघाडीच्‍या प्रदेश सचिव सौ. नंदाताई पाऊलझगडे, प्रा. भूषण दाभाडे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बुलडाणा लाइव्हचे घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अन्सार खान, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष श्रीधर गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष विठ्ठल अवताडे, महिला शहराध्यक्षा सौ. अलकाताई बांगर यांची उपस्थिती होती

सौ. नंदाताई पाऊलझगडे व प्रा. भूषण दाभाडे यांच्या नेतृत्वात शेगाव तालुक्यातील खातखेड, बोरगाव, पहूर पूर्णा व गोळेगाव येथील महिलांना बचत गटाविषयी माहिती तसेच माक्‍स व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

नांदुरा येथे मास्‍क, सॅनिटायझर वाटप

डॉ. शिंगणे यांच्‍या वाढदिवसानिमित्त नांदुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन मानकर व मलकापूर विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रदीपभाऊ हेलगे यांच्या नेतृत्वात मास्‍क वाटप करण्यात आले. यावेळी गोदावरीताई जगदाळे, संध्याताई गोलांडे, संजूभाऊ चोपडे, विनायकभाऊ मुऱ्हे, सारंग देशमुख, शुभम ढवळे, मोहन काटे, अनिल सकळकर, रहीम खान, सीताब खान, कलीम परवेज खान आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्‍नपूर्णा अन्न सत्रालयात वृद्ध,निराधारांना अन्नदानाचा कार्यक्रम तथा औषधी वाटपाचा कार्यक्रम तसेच वृद्धाश्रमात काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांना 1100 रुपये मेहनतानाही देण्यात आला. हा कार्यक्रम निमगाव येथील वृद्धाश्रमात मलकापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ. प्रदीपभाऊ हेलगे यांनी घेतला.कार्यक्रमाला नांदुरा शहराध्यक्ष नितीन मानकर, तालुका कार्याध्यक्ष संजय चोपडे, विनायक मुऱ्हे, शिवाजी ताठे, सुरेशभाऊ पाटील, डॉ. राजेंद्र देशमुख, मोहन पाटील, शुभम हेलगे, शुभम ढवळे, अजय वगारे, पवन ठाकूर, रवीभाऊ चांबारे, गोपाळराव घोगले, सचिन उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भाऊराव मुऱ्हे यांनी सहकार्य केले.

बुलडाणा लाइव्‍हच्‍या साहेब विशेषांक प्रकाशन सोहळ्यात पिऊ सागर पाऊलझगडे या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले. विशेषांकासह तिने दिलेली ही गोड छबी. पिऊ महिला प्रदेश सचिव सौ. नंदाताई पाऊलझगडे यांची नात आहे.