पातुर्ड्यात पावसाने घर कोसळून आर्थिक नुकसान
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील पातुर्डा परिसरात गेल्या ५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास शेख युनूस शेख अब्दुल यांच्या राहत्या घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने घराचा अर्धा भाग कोसळला. ऐन पावसाळ्यात हे मजूर कुटुंब बेघर झाले आहे. घटनेची माहिती महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाला या कुटुंबाने दिली. मात्र सुटीमुळे …
Aug 21, 2021, 21:41 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील पातुर्डा परिसरात गेल्या ५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास शेख युनूस शेख अब्दुल यांच्या राहत्या घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने घराचा अर्धा भाग कोसळला. ऐन पावसाळ्यात हे मजूर कुटुंब बेघर झाले आहे. घटनेची माहिती महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाला या कुटुंबाने दिली. मात्र सुटीमुळे पंचनामा झाला नाही. नुकसान भरपाई अथवा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी शेख ईनुस यांनी केली आहे.