नांदुऱ्यातील १४, मोताळ्यातील ८ गावांत पाणीटंचाई घोषित; प्रशासनाने लादले निर्बंध!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर उपविभागात मोताळा तालुक्यातील 8 व नांदुरा तालुक्यातील 14 गावांमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. यात नांदुरा तालुक्यातील कोलासर- सांगवा, पिंपळखुटा खुर्द, नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड, हिंगणा दादगाव, औरंगपूर, खेडा, दहीगाव, खुमगाव, शेलगाव मुकूंद, बेलाड, येरळी नवी व दहीवडी या गावांचा समावेश आहे तर मोताळा तालुक्यातील …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर उपविभागात मोताळा तालुक्यातील 8 व नांदुरा तालुक्यातील 14 गावांमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. यात नांदुरा तालुक्यातील कोलासर- सांगवा, पिंपळखुटा खुर्द, नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड, हिंगणा दादगाव, औरंगपूर, खेडा, दहीगाव, खुमगाव, शेलगाव मुकूंद, बेलाड, येरळी नवी व दहीवडी या गावांचा समावेश आहे तर मोताळा तालुक्यातील खामखेड, गोतमारा, पोफळी, तरोडा, शेलगाव बाजार, गुळभेली, उबाळखेड व दाभा गावांचा समावेश आहे.

भूजल अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहिरीचे खोदकाम करणार नाही. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी पंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर मनोज देशमुख यांनी कळविले आहे.