नांदुऱ्यात अजबच फसवणुकीचा प्रकार…. म्‍हणे “टच’ करा.. अन्‌ गेले २ लाख रुपये!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील संभाजीनगरमधील एका तरुणाच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याची घटना २२ सप्टेंबरला समोर आली आहे. विठ्ठल मनोहर सुरडकर (३५, रा. संभाजीनगर, नांदुरा) यांनी तक्रारीत म्हटले आहे, की मुंबई येथील एचडीएफसी कमला मिल्स शाखेत त्यांचे खाते आहे. २२ सप्टेंबरला दुपारी साडेतीनला त्यांच्या मोबाइलवर 8826047469 …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील संभाजीनगरमधील एका तरुणाच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याची घटना २२ सप्टेंबरला समोर आली आहे.

विठ्ठल मनोहर सुरडकर (३५, रा. संभाजीनगर, नांदुरा) यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की मुंबई येथील एचडीएफसी कमला मिल्स शाखेत त्‍यांचे खाते आहे. २२ सप्टेंबरला दुपारी साडेतीनला त्‍यांच्‍या मोबाइलवर 8826047469 या क्रमांकावरून फोन आला. नोकरीसाठी नेहमी अर्ज करत असल्याने नोकरी डॉट कॉमवरून त्‍यांना नेहमी फोन येतात. येणाऱ्या शनिवारच्या मुलाखतीबाबत फोन बोलत असताना त्‍यांना समोरच्या व्‍यक्‍तीने “तुमचा ई मेल व्हेरिफाय करतो’, असे म्हणून दोन अंकी कोड व्हेरिफिकेशनसाठी पाठविला. या क्रमांकावर टच करण्यास सांगितले. टच करताच बँक खात्यातील दोन लाख रुपये देवकांत कुमार यांच्या खाते क्रमांकावर ट्रान्सफर झाले, असा त्‍यांना मोबाइलवर मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्‍यांनी पोलीस ठाणे गाठले. ज्‍या खात्‍यावर पैसे वळते झाले त्‍या देवकांत कुमार याच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भूषण गावंडे करीत आहेत.