नांदुर्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ः आमदार एकडे; विकासकामांचे भूमिपूजन
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा नगर परिषदेतर्फे प्रभाग क्रमांक 2 मधील चोपडे प्लॉट, राखोंडेपुरा व आठवडी बाजार परिसरात जलवाहिनी, नवाबपुरा तसेच सिंधी कॉलनीत पेव्हर ब्लॉक रस्ता अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते व नांदुरा उपनगराध्यक्ष लालाभाऊ इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 जानेवारीला झाले. नांदुराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार एकडे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमीन, नगरसेवक अॅड. मोहतशाम रजा, मो. सादिक शेख, अजय भिडे, अनंता भारंबे, पिंटू कोलते, संदीप फाटे, ईल्यास मो. तोसिफ, राजू शेठ मोहनांनी, भाऊसाहेब बावणे, तुळशीराम राखोंडे, नवाब जिया, डॉ. नईम, बळीराम चोपडे, हाजी हुसेन, बाबूसेठ, ईश्वरसेठ जानवानी, असिफ खान, मजहर खान, मनोज रामचंद्रानी, सुरेश खानचंदाणी, अमूल जैन, जावेद खान, तेजपाल जानवाणी, गणेश मात्रे, शेख गफ्फार, सै. साबीर, सूरज राखोंडे व प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.