नांदुरा : साडेपाच हजार जणांना दिली कोरोना लस
नांदुरा (प्रविण तायडे)ः नांदुरा तालुक्यात 25 जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत 5 हजार 520 जणांना लस देण्यात आली.
आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील तसेच दुर्धर आजार असणारे, 45 ते 59 वर्षांवरील व्यक्तींचा लसीकरण केलेल्यांत समावेश आहे. सुरुवातीला हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आले होते. मात्र आता तालुक्यातील वडनेर भोलजी, टाकरखेड, शेंबा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणात 60 वर्षांवरील 2583 जणांचे लसीकरण झाले असून, यामध्ये 1403 पुरुष तर 1180 स्त्रिया आहेत. 45 ते 59 वयोगटातील एकूण 823 जणांना लस देण्यात आली असून, यात 472 पुरुष तर 351 स्त्रिया आहेत. फ्रंट लाईन वर्करमध्ये 1184 जणांना लस देण्यात आली असून, यात 730 पुरुष तर 454 स्त्रिया आहेत. आरोग्य विभागातील 930 जणांना ही लस देण्यात आली आहे यापैकी 467 पुरुष तर 463 स्रियांचा समावेश आहेत. अशाप्रकारे तालुक्यात आतापर्यंत पाच हजार पाचशे वीस जणांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याचे असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून बुलडाणा लाइव्हला देण्यात आली.