दोनशे फूट उंच पुलावर अडकलेल्या मयूरला असे मिळाले जीवदान!

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कबूतर पकडण्यासाठी दोनशे फूट उंचीच्या पुलावर चढलेल्या 12 वर्षीय मुलाला 4 तासांनी टायगर ग्रुपने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप खाली आणले. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे 12 जूनला दुपारी घडली. जीर्ण झाल्याने पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन दोनशे फूट उंचीच्या पुलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पुलावर खिरोडा येथील १२ वर्षीय …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कबूतर पकडण्यासाठी दोनशे फूट उंचीच्‍या पुलावर चढलेल्या 12 वर्षीय मुलाला 4 तासांनी टायगर ग्रुपने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप खाली आणले. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे 12 जूनला दुपारी घडली.

जीर्ण झाल्याने पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन दोनशे फूट उंचीच्या पुलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पुलावर खिरोडा येथील १२ वर्षीय मयूर हिवराळे कबुतर पकडण्यासाठी चढला. मात्र उतरता येत नसल्याने व पुलाच्‍या उंचीवरून खाली पाहताना तो घाबरून रडत बसला. वाचवा वाचवा… अशी आरडाओरड करत हाेता. तो 4 तासांपासून पुलावर अडकू पडल्याची बाब टायगर ग्रुपचे अध्यक्ष दादा ठाकूर यांना कळताच त्‍यांनी सहकारी स्वप्नील गोतरकार, भास्कर दाणे, मोहन ठाकूर, सुनिल हिवराळे यांच्‍यासह जाऊन रेस्क्यू ऑपरेशनव्दारे त्‍याला सुरक्षित खाली आणले. त्‍यामुळे खिरोडा ग्रामस्थांनी टायगर ग्रुपचे कौतुक केले, तर मयूरचे वडील व कुटुंबाने आभार मानले.