दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त जानोरीत रक्तदान शिबीर
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जानोरी (ता. शेगाव) येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.
सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने माजी आमदार सानंदा यांच्या आवाहनानुसार हे शिबीर 2 मे रोजी घेण्यात आले. यात २६ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सुरेश वनारे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल सोनटक्के, माजी सभापती विजय काटोले यांनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ. अर्चना ढोले (सरपंच), सौ. दुर्गा बोरसे, सौ. सुरेखा घेंगे, सौ. लता घेंगे, शे. रेहनाबी शे. मोहसीन, सौ. दीक्षा भोजने, काशिराम डांगे, नितीन बारहाते, रमेश सावळे, मंगेश ढोले, शंकर सोळंके (उपसरपंच), रमेश डांगे, प्रभाकर बोरसे, नंदकिशोर गावंडे, नीलेश चितोडे, गजानन भोजने, सुधाकर घेंगे, उत्तमभाऊ घोपे, शिवा माळी, ज्ञानेश्वर शेजोळे गजानन नागे, चंद्रकांत शेगोकार, स्वप्नील बारहाते, गोविंदा ठाकरे, अक्षय मानकर, वैभव मानकर, वैभव महाले, ऋषिकेश बारहाते, आदित्य बदरखे, सोपान ढोले, हरीश ढोले, आशिष डांगे, गजानन ठाकरे, सुरेश चितोडे, सोनू धांडे, राजू भोंडे, अंबादास डांगे, वर्धमान लांडगे आदींनी पुढाकार घेतला.