दारूच्या नशेत युवकाची आत्‍महत्‍या; खामगावमधील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूच्या नशेत गळफास घेऊन ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना खामगाव शहरातील सजनपुरी भागात आज, २० ऑक्टोबरला पहाटे ४ च्या सुमारास समोर आली. गजानन गोकूळ सावरकर (४०, रा. सजनपुरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. उदाराम गोकूळ सावरकर (३६, रा. सजनुपरी ता. खामगाव) यांनी घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूच्‍या नशेत गळफास घेऊन ४० वर्षीय व्‍यक्‍तीने आत्‍महत्‍या केल्याची घटना खामगाव शहरातील सजनपुरी भागात आज, २० ऑक्‍टोबरला पहाटे ४ च्‍या सुमारास समोर आली.

गजानन गोकूळ सावरकर (४०, रा. सजनपुरी) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. उदाराम गोकूळ सावरकर (३६, रा. सजनुपरी ता. खामगाव) यांनी घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. कानोबा व्यायाम शाळेजवळ गजानन आपल्या चार भावांसह राहत होता. घरासमोरील खोलीतील टिनाच्‍या लोखंडी अँगलला रुमालाच्‍या साह्याने त्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्‍याचे भाऊ उदाराम यांच्‍या तक्रारीनुसार, तो नेहमी दारू पित होता. दारूच्‍या नशेतच त्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. जगदाळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ किरण राऊत करत आहेत.