द बर्निंग ट्रक… मलकापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील थरार!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लक्ष्मीनगरजवळ प्लास्टिकचे कच्चे साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना काल, २८ ऑगस्टच्या सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. धावत्या ट्रकला (क्र. जीजे ०५ बीएक्स ८३६८) अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडून वाहनधारक भयभीत झाले. यात कंटेनर व साहित्याचे मोठे नुकसान झाले …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लक्ष्मीनगरजवळ प्लास्टिकचे कच्चे साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना काल, २८ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी सहाच्‍या सुमारास घडली.

धावत्या ट्रकला (क्र. जीजे ०५ बीएक्स ८३६८) अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडून वाहनधारक भयभीत झाले. यात कंटेनर व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांना घटनेची माहिती मिळताच त्‍यांनी अग्निशमन दलाला संपर्क करून वाहन घटनास्थळी पाठवले. अग्निशमन दलाचे वासुदेव भोपळे, शब्बीर खान, कय्युम खान, सूरज राजपूत, अशोक बोंडे यांच्‍यासह नागरिकांनी प्रयत्न करून आग विझविली.