त्‍या भुकेल्या पोटांसाठी धावली ‘अंजुमन!’

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंजुमन शिक्षण संस्था ही शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही पुढे असते. कोरोनाच्या संकट काळात सामान्य जनता त्रस्त झाली असताना गरीब, निराश्रितांचा वाली कोण, या भावनेने जागृत होऊन अंजुमन शिक्षण संस्थेतर्फे शहरातील निराश्रितांना अन्नदान करण्यात आले. संस्थेच्या आवारातच स्वयंपाक करून मागील तीन दिवसांपासून वेगवेगळे प्रकारचे अन्न… कधी भाजी पोळी, …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंजुमन शिक्षण संस्था ही शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही पुढे असते. कोरोनाच्या संकट काळात सामान्य जनता त्रस्त झाली असताना गरीब, निराश्रितांचा वाली कोण, या भावनेने जागृत होऊन अंजुमन शिक्षण संस्थेतर्फे शहरातील निराश्रितांना अन्नदान करण्यात आले.

संस्थेच्या आवारातच स्वयंपाक करून मागील तीन दिवसांपासून वेगवेगळे प्रकारचे अन्न… कधी भाजी पोळी, कधी मसालेभात व सोबत केळी आदी अन्न वाटप केले जात आहे. शहरातील कानाकोपऱ्यात आश्रय घेतलेल्या निराश्रितांची भूक भागवली जात आहे. बस स्टँड, शिवाजी चौक उड्डाणपूल, सई बाई मोटे रुग्णालय, गांधी चौक, अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी स्वतः संस्थेच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत जाऊन संस्थेचे उपाध्यक्ष अतिक मेमन यांनी अन्नदान केले. त्यांना प्राचार्य इम्रान खान, प्राथमिकचे मुख्याध्यापक फिरोज खान, सलीम खान, शेख अहमद व शेख हसन यांनी सहकार्य केले.