तरोडा डी येथील ज्येष्ठांना सरपंच ॲड. कडाळेंनी करवले कोरोना लसीकरण
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तरोडा डीचे सरपंच ॲड. प्रवीण कडाळे यांनी गावकऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. त्याचे पुढचे पाऊल म्हणून 45 वर्षांवरील पुरुष व महिलांना त्यांनी कोरोना लसीकरण करवून आणले.
शासकीय वैद्यकीय अधिकारी नीलेश देशमुख व सरपंच ॲड. कडाळे यांच्या पुढाकाराने आडसूळ येथील प्राथमिक आरोग्य कोरोना चाचणी व लसीकरण करून घेतले. यात 86 जणांना लसीकरण करण्यात आले. ॲड. प्रवीण कडाळे सरपंच झाल्यापासून गावात अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवून गावाच्या विकासासाठी पावले टाकण्यात येत आहेत. कोरोनापासून गावाला दूर ठेवण्यासाठी सरपंचांनी आजवर अनेक प्रयत्न केले. स्वतः सॅनिटायझर मशिन घेऊन गावात फवारणी केली. उपक्रमात आरोग्य सेविका श्रीमती माठे, शिपाई वैभव शेजोळ उपसरपंच सौ. जुमळे, गोपाल जुमळे, शेखर कडाळे, श्याम कडाळे, प्रवीण कडाळे, गोपाल कडाळे, सतीश कडाले, राम जुमळे, गजानन डाबेराव, श्री. खंडारे आदींनी पुढाकार घेतला.