जिगावच्या भूसंपादनाला वेग! 915 हेक्टर जमीन संपादित; 310 कोटींचे वाटप प्रगतिपथावर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिगाव सिंचन प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाला वेग आला आहे. सोबतच तब्बल 310 कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी व हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. भूसंपादन कार्यालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी “बुलडाणा लाइव्ह’ला ही माहिती दिली. यानुसार नांदुरा तालुक्यातील भोटा गावातील 346 हेक्टर …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिगाव सिंचन प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाला वेग आला आहे. सोबतच तब्बल 310 कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी व हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे.

भूसंपादन कार्यालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी “बुलडाणा लाइव्ह’ला ही माहिती दिली. यानुसार नांदुरा तालुक्यातील भोटा गावातील 346 हेक्टर जमीन जिगावसाठी संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात 365 लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 113 कोटी रुपये इतका मोबदला मंजूर करण्यात आला आहे. आजपर्यंत यातील 60 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले.

काही त्रुटी, हरकती व मयत व्यक्तीमुळे उर्वरित रक्कम वाटपाचे काम रखडले आहे. मात्र या अडचणी दूर झाल्यावर उर्वरित रकमेचे वाटप करण्यात येईल. याशिवाय माहुली (ता. जळगाव जामोद) येथील 214 शेतकऱ्यांची 239 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यापोटी 79 कोटी इतका मोबदला देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे “सी’ फॉर्म भरून घेण्यात आले आहे. याचे वाटपास सुरुवात करण्यात आली.

हिंगणे बाळापूरचे वाटप तहसीलमध्ये
दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील हिंगणे बाळापूरसाठी 118 कोटी रुपये इतका मोबदला मंजूर करण्यात आला आहे. तेथील 264 भूधारकांची 330 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मोबदला वाटप जळगाव जामोद तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे. दरम्यान या गुंतागुंतीच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हाधिकारी (भूसंपादन- मध्यम प्रकल्प) भिकाजी घुगे यांनी नियोजन केले. त्यांचे सहकारी किशोर हटकर, विजय इंगळे, वरगट, कुडके, प्रकाश इंगळे, ज्ञानदीप इंगळे, प्रिया डोंगरे, स्मिता ठीगळे, रोहिणी पाटील, नागेश खरात यांनी अथक परिश्रम घेतले.