जावईबाप्पू अंघोळ करताना बुडू लागले…!; “या’ जलविरांनी वाचवले!!; संग्रामपूरच्‍या वारी हनुमान येथील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वारी हनुमान सागर (ता. संग्रामपूर) येथे २८ ऑगस्टला बावनबीर येथील सलून व्यावसायिक किशोर पडियार यांचे जावई सौरभ चव्हाण (रा. आर्वी, जि. अमरावती) आंघोळ करत असताना खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. बावनबीर येथील अक्षय लोणकर व पंकज करणकार हे युवक त्यांच्यासाठी देवदूत ठरले. स्वतःच्या जिवाची काळजी न …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वारी हनुमान सागर (ता. संग्रामपूर) येथे २८ ऑगस्टला बावनबीर येथील सलून व्यावसायिक किशोर पडियार यांचे जावई सौरभ चव्‍हाण (रा. आर्वी, जि. अमरावती) आंघोळ करत असताना खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. बावनबीर येथील अक्षय लोणकर व पंकज करणकार हे युवक त्‍यांच्‍यासाठी देवदूत ठरले. स्वतःच्‍या जिवाची काळजी न करता विनाविलंब त्‍यांनी पाण्यात उडी घेऊन त्‍यांना सुरक्षित बाहेर काढले. सौरभवर सध्या अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती धोक्‍याबाहेर आले. अक्षय आणि पंकज या जलवीरांचा काँग्रेसचे पदाधिकारी संजय ढगे यांनी सत्कार करत कौतुक केले. बावनबीर ग्रामपंचायतीनेही छोटेखानी कार्यक्रम घेत त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी सरपंच गजानन मनसुटे, उपसरपंच शे. नजिर शेख कदीर, शिक्षक गजानन काळे, विजय शेगोकार, शंकर शैलार, आकाश काळमेंघ, मोहन खोडे आदी उपस्थित होते.