चिमुकल्या मेहकमुळे मलकापूरने अनुभवला ‘फॅशन का जलवाँ’

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अवघ्या 10 वर्षीय चिमुकलीने आपल्या मेहनत आणि गुणवत्तेने मलकापूर शहराचे नाव मोठे केले आहे. मेहक विशाल जैस्वाल हिने फॅशन क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे कौतुक सध्या शहरात होत आहे. एमएसएम इंग्रजी शाळेची ती विद्यार्थिनी असून, तिने आजवर जिंकलेल्या पुरस्कारांची यादी ऐकली तरी हैराण व्हाल! नुकतेच तिने आणखी एका पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे. …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः अवघ्या 10 वर्षीय चिमुकलीने आपल्या मेहनत आणि गुणवत्तेने मलकापूर शहराचे नाव मोठे केले आहे. मेहक विशाल जैस्वाल हिने फॅशन क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे कौतुक सध्या शहरात होत आहे. एमएसएम इंग्रजी शाळेची ती विद्यार्थिनी असून, तिने आजवर जिंकलेल्या पुरस्‍कारांची यादी ऐकली तरी हैराण व्‍हाल! नुकतेच तिने आणखी एका पुरस्‍कारावर स्‍वतःचे नाव कोरले आहे. पुण्यात ‘तारे जमीन पर’ टॅलेंट शोमध्ये फॅशन विभागात तिने शायनिंग स्‍टार अवार्ड जिंकला. एवढेच नाही तर नॅशनल डान्‍स कॉम्‍पिटिशन मॅजिक बुक्‍स ऑफ रेकॉर्डसाठीही तिने बक्षीस जिंकले आहे.

आजवर मेहकने विविध डान्‍सिंग आणि मॉडेलिंग स्‍पर्धांत यश मिळवले आहे. मुंबईमध्ये झालेल्या इंडिया किड्‌स फॅशन वीकमध्ये मिस युनायटेड ऑफ इंडिया मॉडेल लोपामुद्रासोबत तिने रॅम्‍पवॉक केला होता, हे विशेष. याशिवाय क्रिसमस कार्निवल ज्‍युनिअर किड्‌स, फेस ऑफ पुणे, एम स्‍टार किड्‌स कॉम्‍पिटिशन, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, फॅशन इन्‍स्‍टिट्यूट, मास्‍टर मलकापूर, फॉर फॉक्‍स प्रोडक्‍शन इन पुणे यासह अनेक स्‍पर्धांत तिने सहभागी होऊन यश मिळवले आहे. एवढ्या कमी वयात तिचा असलेला फॅशन सेन्‍स कौतुकास पात्र ठरत आहे. मेहक चौथीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील मलकापुरातील व्‍यावसायिक आहेत. तिच्‍या यशामुळे मलकापूरच्‍या लौकिकात भर पडत आहे. शिवाय तिच्‍या आई-वडिलांचेही नाव तिने मोठे केले आहे.