चला अंबाबरवा… पर्यटकांसाठी झाले खुले, जंगल सफारी, जटाशंकरचा धबधबा, इको पार्कही सुरू, सहा महिन्यांपासून होते बंद!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंबाबरवा अभयारण्याचे द्वार १६ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी उघडले आहे. सहा महिन्यांपासून हे अभयारण्य कोरोनामुळे बंद होते. पहिल्या श्रावण सोमवारी अनेक पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली. सातपुडा पर्वतरांग सध्या निसर्गसौंदर्याने बहरली आहे. नद्या, नाले वाहत आहेत. वसाली इको सायन्स पार्कला स्वातंत्र्य दिनी २८७ पर्यटकांनी भेट दिली. पार्कपासून दोन कि.मी.अंतरावर जटाशंकर हे प्राचीन स्थळ …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंबाबरवा अभयारण्याचे द्वार १६ ऑगस्‍टपासून पर्यटकांसाठी उघडले आहे. सहा महिन्यांपासून हे अभयारण्य कोरोनामुळे बंद होते. पहिल्या श्रावण सोमवारी अनेक पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली.

सातपुडा पर्वतरांग सध्या निसर्गसौंदर्याने बहरली आहे. नद्या, नाले वाहत आहेत. वसाली इको सायन्स पार्कला स्वातंत्र्य दिनी २८७ पर्यटकांनी भेट दिली. पार्कपासून दोन कि.मी.अंतरावर जटाशंकर हे प्राचीन स्‍थळ आहे. तिथे असलेला धबधबा पर्यटकांचे आकर्षण असतो. सध्या सातही दिवस नॉनस्‍टॉप पर्यटन सुरू झाले आहे. अनेकांना बिबट्याचेही दर्शन झाले. जंगल सफारीसाठी १४ सीटर एसी बस उपलब्ध आहेत. याचे भाडे दहा पर्यटक मर्यादेपर्यंत ३ हजार असून, गाईडचे शुल्‍क ३५० रुपये आहे. शुल्‍क भरून खासगी कारही पर्यटकांना नेता येते. १० गाईडमध्ये दाेन महिला गाईडही आहेत, हे विशेष.