गुड न्यूज ः जळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार देखभाल दुरुस्ती

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.राज्यातील सर्व नागरी पाणी पुरवठा व मलनिःसारण योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जळगाव जामोद व 140 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील सर्व नागरी पाणी पुरवठा व मलनिःसारण योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याबाबत तसेच जिल्हा परिषदेकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वेतन व रजा अंशदान बाबतची अट रद्द करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यमंत्री संजय बनसोडे हे या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती दिपाली देशपांडे-सावडेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.