खामगावातील शाळा फोडणारा चोर अखेर जेरबंद!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यातील शाळांना सध्या चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. खामगाव तालुक्यातील विहिगाव, आंबेटाकळी, बोरीअडगाव येथील शाळा फोडून साहित्याची चोरी झाली होती. शाळेत जाऊनही चोरीच करायचे शिकलेल्या या २२ वर्षीय चोरट्याच्या मुसक्या खामगाव शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी शेख समीर शेख जुबैर (रा. बाळापूर फैल खामगाव) याला काल, २९ जुलैला सकाळी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यातील शाळांना सध्या चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. खामगाव तालुक्‍यातील विहिगाव, आंबेटाकळी, बोरीअडगाव येथील शाळा फोडून साहित्‍याची चोरी झाली होती. शाळेत जाऊनही चोरीच करायचे शिकलेल्या या २२ वर्षीय चोरट्याच्‍या मुसक्‍या खामगाव शहर पोलिसांनी आवळल्‍या आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी शेख समीर शेख जुबैर (रा. बाळापूर फैल खामगाव) याला काल, २९ जुलैला सकाळी ११ च्‍या सुमारास ताब्यात घेतले. त्याने खामगाव शहरातील नगरपरिषद शाळा क्र. ७ मध्ये २३ जुलैला चोरी केल्याची कबुली दिली अाहे. चोरी केलेला एकूण १४२०० मालही त्‍याने पोलिसांना काढून दिला. खामगाव तालुक्‍यात घडलेल्या चोऱ्यांतील संशयितही त्‍याच्‍या अटकेतून समोर येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ही कारवाई खामगाव शहर पोलिस निरीक्षक सुनील अंबूलकर यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकप्रमुख पोलीस उपनिरिक्षक गौरव सराग, पोहेकाँ गजानन बोरसे, नापोकाँ सूरज राठोड, पोकाँ दीपक राठोड, पोकाँ प्रफुल टेकाळे, पोकाँ जितेश हिवाळे, पोकाँ अमरदिपसिंह ठाकूर, पोकाँ अनंत डुकरे, पो. ना. राज फासे यांनी केली.