खामगावात साकारणार जिल्ह्यातील पहिला खासगी ऑक्सिजन प्लांट!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात पहिला खासगी ऑक्सिजन प्लांट खामगाव येथे साकारला जाणार असून, यासाठी गोएंका ग्रुपने पुढाकार घेतला आहे. प्लांटचे भूमिपूजन नंदकिशोर गोएंका यांच्या हस्ते झाले. दीड महिन्यात हा प्लांट कार्यान्वित होऊन ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. जनुना शिवारातील 1 एकरावर हा प्लांट उभारला जात असून, यासाठी 6 कोटींपर्यंत खर्च केला जाणार असल्याचे ग्रुपतर्फे सांगण्यात …
Apr 29, 2021, 16:53 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात पहिला खासगी ऑक्सिजन प्लांट खामगाव येथे साकारला जाणार असून, यासाठी गोएंका ग्रुपने पुढाकार घेतला आहे. प्लांटचे भूमिपूजन नंदकिशोर गोएंका यांच्या हस्ते झाले.
दीड महिन्यात हा प्लांट कार्यान्वित होऊन ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. जनुना शिवारातील 1 एकरावर हा प्लांट उभारला जात असून, यासाठी 6 कोटींपर्यंत खर्च केला जाणार असल्याचे ग्रुपतर्फे सांगण्यात आले. प्लांटमधून रोज 7 क्युबिक मीटरचा साठा असणारी 500 सिलिंडर्स उपलब्ध होतील. कोरोनाच्या संकटात जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.