खामगावच्या आगग्रस्तांना छदाम्ही मिळणार नाही!; मदतीची आशा धुसर
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लागोपाठ आग लागून खामगाव शहरातील आठवडे बाजारातील 20 दुकाने खाक झाली. 47 लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यांना नुकसान भरपाई मिळेलच, ही शक्यता नाही. कारण शासनाकडून केवळ घर अथवा संसारोपयोगी साहित्यासाठी मदतीची तरतूद आहे. केवळ पंचनामा केला जातो, मदत नाही, असेच सरकारी सूत्रांनी यावर सांगितले आहे. एखाद्या दुकानदाराने दुकानाचा विमा …
Apr 13, 2021, 09:48 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लागोपाठ आग लागून खामगाव शहरातील आठवडे बाजारातील 20 दुकाने खाक झाली. 47 लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यांना नुकसान भरपाई मिळेलच, ही शक्यता नाही. कारण शासनाकडून केवळ घर अथवा संसारोपयोगी साहित्यासाठी मदतीची तरतूद आहे. केवळ पंचनामा केला जातो, मदत नाही, असेच सरकारी सूत्रांनी यावर सांगितले आहे. एखाद्या दुकानदाराने दुकानाचा विमा काढला असेल तर त्या कंपनीकडून मदत मिळवली जाऊ शकते. त्यातही दुकान स्वतःच्या मालकीचे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले तरी मदतीचा आशा धुसरच आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पुढे येऊ त्यांना मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे.