कर्तव्यनिष्ठेचा गौरव… पोहेकाँ जगन्नाथ रौंदळे झाले एएसआय!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रामाणिक कार्याचा सन्मान कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पदोन्नती देऊन केल्याचे पोहेकाँ जगन्नाथ गोविंद रौंदळे यांच्या उदाहरणावरून समोर येत आहे. श्री. रौंदळे यांना सहायक पोलीस उपनिरिक्षकपदी (एएसआय) पदोन्नती देण्यात आली आहे. शेगाव शहर पोलीस ठाण्यात श्री. रौंदळे कार्यरत असून त्यांच्या पोलीस खात्यातील आजपर्यंतच्या कार्याची दखल यासाठी घेण्यात आली आहे.
श्री. रौंदळे हे 1989 मध्ये पोलीस खात्यात दाखल झाले. बुलडाणा येथे स्थानिक गुन्हे शाखेने अविरत, कर्तव्यतत्पर सेवा देऊन प्रामाणिकपणे त्यांनी ड्यूटी केली. तद्नंतर मेहकर, जलंब आणि काही वर्षांपासून शेगाव शहर पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. खात्यात श्री. रौंदळे यांची प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख आहे. संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या छोट्याशा गावातील ते रहिवासी आहेत. अत्यंत हलाखीची असतानाही संघर्षमय जीवन जगत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मोठ्या मुलीला इंजिनिअर व तीन नंबरच्या मुलालासुद्धा इंजिनिअर केले असून, दोन नंबरच्या मुलाला उच्च शिक्षण देत आहेत. अतिशय सुस्वभावी, मनमिळावू श्री. रौंदळे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल अनेक स्तरांतून त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.